Mira Bhayandar news – नरेंद्र मेहतांच्या बॉडीगार्डची परिचारिकेला शिवीगाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या सुरक्षारक्षकाने परिचारिकेला शिवीगाळ केल्याचा प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. यामुळे पालिकेच्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी रुग्णालयातील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सुरक्षारक्षक अरविंद रंजेरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्रा चावलेल्या रुग्णाला रॅबिज लसीकरणासाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परिचारिका रेखा महाला यांनी रुग्णाला प्रथम कक्ष क्रमांक २७ मध्ये नोंदणी करून त्यानंतर कक्ष क्रमांक ८ मध्ये रॅबिज इंजेक्शन घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने अरविंद रंजेरी याने शिवीगाळ करत धिंगाणा घातला.