
‘दुनिया में दो किसम के लोग होते है, जिंदा या मुर्दा और फिर होते है तिसरे ‘घायल’… हम से सब छिन लिए… हमें जिंदा छोड दिए… गलती किए…’ अशा दमदार डायलॉगसह टिझर रिलिज करण्यात आला आहे. मिर्झापूर या प्रचंड गाजलेल्या वेबसिरीजचा बहुप्रतिक्षित दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवारी मिर्झापूर-2 चा टीझर रिलिज करण्यात आला. 23 ऑक्टोबर 2020 रोजी मिर्झापूर-2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अॅमेझॉन प्राईम वरील ‘मिर्झापूर’ ही वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली होती. या वेबसीरिजने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची मने जिंकली होती. या वेबसिरीजमध्ये विक्रांत मास्से, अली फलझ, श्रीया पिळगावकर व श्वेता त्रिपाठी व पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते. पहिल्या सिझनचा शेवट एवढा जबरदस्त आहे की त्यामुळे प्रेक्षक पुढे काय होणार यासाठी दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.




























































