यंदाच्या सौंदर्य स्पर्धेत ‘ट्रान्सवुमन’ही उतरणार, इतिहासात पहिल्यांदाच प्रवेश मिळणार

miss-diva

‘मिस दीवा’ने शीर्षक प्रायोजक म्हणून एक फॅशन इनग्रेडियन्ट ब्रँड ‘लीवा’च्या सहयोगाने आपल्या 9व्या स्पर्धेची घोषण केली आहे. आपल्या आसपास जे काही घडत आहे, त्याने आपली ‘नॉर्मल’ची व्याख्याच बदलून टाकली आहे. पण लीवा मिस दीवा 2021, को-पावर्ड बाय MX टकाटक, नवीन सौन्दर्य सम्राज्ञी शोधण्यासाठी तोच उत्साह दाखवेल. डिजिटल मीडियाचा उपयोग करून घेत यावेळी एका नव्या फॉरमॅटचा उपयोग करण्यात येणार आहे. हिंदुस्थानने एकापेक्षा जास्त वेळा मिस युनिव्हर्स बिरुद जिंकले आहे. अलीकडेच ‘लीवा मिस दीवा 2020’ जिंकणाऱ्या अॅडलाइन कॅसलीनोने मिस युनिव्हर्स 2020 मध्ये चौथे स्थान पटकावले, ज्यामुळे हिंदुस्थान पुन्हा एकदा जागतिक नकाशावर झळकला आहे.

11 जून रोजी सुरू झालेल्या या सौंदर्यस्पर्धेने देशभरातील तरुण प्रतिनिधींना शोधण्यासाठी एक राष्ट्रव्यापी हंट जाहीर केला आहे. यामध्ये होतकरू सौंदर्यवती आपली स्वप्ने साकारण्यासाठी स्पर्धेत उतरतील.

या स्पर्धेच्या सर्व समावेशकतेबद्दल सांगायचे तर, सौंदर्य स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘ट्रान्सवुमन’ यांना देखील स्पर्धेत सहभागी करून सौंदर्य ही संकल्पना पुनर्व्याख्यायित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय, सर्व सुंदरींसाठी यंदा उंचीचा निकष देखील थोडा शिथिल करून 5’4” करण्यात आला आहे.

या निवड प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करताना MX टकाटक या भारताच्या आघाडीच्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एक विशिष्ट ऑडिशन टास्क मागवण्यात आला आहे.

त्यानंतर, निवडलेल्या अंतिम 20 स्पर्धकांना मुंबई येथे कठोर प्रशिक्षण देऊन त्यांचे ग्रूमिंग करण्यात येईल. ह्या सर्व स्पर्धक तरुणी ऑक्टोबर 2021 मध्ये होणार्याा ग्रँड फिनालेत प्रतिष्ठित मुकुटासाठी स्पर्धेत उतरतील.

2013 मध्ये सुरू झालेल्या ह्या प्रवासाच्या माध्यमातून मिस दीवाने प्रतिभावान हिंदुस्थानी तरुणींना आपल्या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेद्वारे सर्वांसमोर आणले आहे. हा मुकुट म्हणजे तरुणींसाठी केवळ मिरवण्याची वस्तू नाही, तर भविष्यातील खरेखुरे आयकॉन म्हणून स्वतःला घडवण्यात मदत करणारा आणि जगासमोर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणारा मंच आहे. अत्यंत विशेष अशा क्षेत्रांमध्ये आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्ही पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या दैवी सामर्थ्याचे समर्थन करत आहोत. 8 वर्षांची परंपरा चालू ठेवत हा प्रतिष्ठित किताब तरुण प्रतिभावंतांना आंतरराष्ट्रीय मंचावर ओळख मिळवून देण्यासाठी ग्रूम, प्रोत्साहित आणि सक्षम करत राहील आणि असा एक गट तयार करेल जो आंतरराष्ट्रीय सीमा पार करून आपले सामर्थ्य दाखवू शकेल.

सध्या संपूर्ण ब्रह्मांडच ‘नवीन नॉर्मल’ चा अंगीकार करत असताना, या वर्षी सुद्धा… द शो मस्ट गो ऑन… आपल्या 9व्या आवृत्तीत मिस दीवा तुमच्यासाठी घरबसल्या ऑडिशनसाठी अर्ज करण्याची नामी संधी घेऊन येत आहे. एका नवीन डायनॅमिक फॉरमॅटसह लीवा मिस दीवा 2021 अशी एक मुलगी शोधण्याची आपली परंपरा चालू ठेवेल, जी सौंदर्य, आत्मविश्वास, चुणचुणीत आणि डायनॅमिक असण्याची व्याख्याच बदलून टाकेल. यामागील मिस दीवा चे ध्येय भविष्यात आपल्या देशाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या नव्या पिढीच्या तरुणींना संपूर्ण साहाय्य करण्याचे आहे.

लीवा मिस दीवा 2021 ची विजेता मिस युनिव्हर्स 2021 या अत्यंत प्रतिष्ठित मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करेल, तर लीवा मिस दीवा सुप्रानॅशनल 2021 मिस सुप्रानॅशनल 2021 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल. आपल्या देशाची मान पुन्हा एकदा उंचावण्याची वेळ आली आहे.

आजच्या डिजिटल युगात रममाण असणार्याव अत्यंत प्रतिभावान आणि अदम्य पिढीला देशात कंटेंट कंझंप्शनला रेटा देणारे आकर्षक शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी सक्षम करण्याच्या व्हिजन सहMX टकाटक हे या स्पर्धेत ऑडिशन देण्यासाठी प्रवेशद्वाराचे काम करणार आहे.

या सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले भारतातील एक लोकप्रिय व तरुणाईचे चॅनल,MTV वरून प्रसारित होईल.

सर्व अर्जदारांसाठी अर्ज करण्याचे निकष आहेत:
• उंची: 5’4” किंवा त्याहून जास्त
• वय: 18-27 वर्षे (31 डिसेंबर 2021 पर्यंत 27)
• वैवाहिक स्थिती: अविवाहित, सिंगल आणि एंगेज्ड नसलेली
• भारतीय पासपोर्ट धारक
• OCI कार्ड धारक आणि NRI हे रनर अप स्थानांसाठी स्पर्धेत दाखल होऊ शकतात
• ट्रान्सवीमेन यांना सहभागी होता येईल

तर मग, तरुणींनो, कसली वाट बघत आहात? नोंदणी करण्यासाठी www.missdiva.comयेथे लॉग ऑन करा आणि आत्ताच अर्ज करा! या सौंदर्य स्पर्धेतील प्रवास सुरू करण्यासाठी MX टकाटक अॅप डाउनलोड करायला विसरू नका. नोंदणी प्रक्रिया 20 जुलै पर्यंत सुरू आहे.

• फेसबुकवर आम्हाला फॉलो करा: @officialmissdiva
• इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा: @missdivaorg
• MX टकाटकवर आम्हाला फॉलो करा: @missdivaorg

हे बघत राहा #LIVAMissDiva2021 #MissDivaAuditions

आपली प्रतिक्रिया द्या