
हैदराबाद येथे ‘मिस वर्ल्ड 2025’ स्पर्धा पार पडत आहे. स्पर्धेचा इंटरव्ह्यू राऊंडही पार पडला आहे. आता 31 मे रोजी ग्रँड फिनाले रंगेल. अवघ्या काही तासांत ‘मिस वर्ल्ड’ कोण होणार हे समजणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष या अंतिम फेरीकडे आहे. विजेत्या ‘मिस वर्ल्ड’ला सुमारे तीन कोटी रुपयांचा हिरेजडित मुकुट घालण्यात येईल. मुकुटाची किंमत सुमारे तीन कोटी रुपये असेल. त्यावर नीलम रत्नासह 1770 हिरे जडवलेले असून तो 18 कॅरेट सोन्यापासून बनलेला आहे, अशी माहिती ‘मिस वर्ल्ड’च्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी दिली.
हिरेजडित मुकुटासह ‘मिस वर्ल्ड’ बनणाऱ्या सौंदर्यवतीला 1.15 कोटी रुपयांचा पुरस्कारदेखील मिळेल. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम जास्त आहे. ज्युलियो मोर्ले यांच्या मते, खरे बक्षीस तर जगभराचा दौरा आणि अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आहे. मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेला 10 मेपासून सुरुवात झालेय. अनेक फेऱ्यांमधून 40 जणी पात्र ठरल्या आहेत.