#MissionAyodhya Live : उद्धव ठाकरेंचे मुंबईत दणक्यात स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परतले. त्यांच्या या अयोध्या दौऱ्याचे अपडेट, फोटो, व्हिडीओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.

आजचा अग्रलेख : महाराष्ट्र ते अयोध्या रामसेतू

#MissionAyodhya Live:

  • ढोल ताशांचा गजर, जय श्रीराम, जय शिवसेनाच्या घोषणांनी परिसर दणाणला
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत
  • विमनातळ परिसर जय श्रीराम, जय शिवसेना, हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकारच्या घोषणांनी परिसर दणाणला
  • कलिनाच्या गेटवर उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी
  • उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार
  • उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना

  • उद्धव ठाकरे यांनी केली सामनाशी खास बातचित

  • मंदिर हे होणारच पण जर या सरकारने मंदिर नाही बांधलं तर भविष्यात हे सरकार नाही बनणार – उद्धव ठाकरे
  • जर राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचाय तर निवडणूकीत या मुद्द्याचा वापर करू नका – उद्धव ठाकरे
  • प्रभू रामचंद्र १४ वर्ष वनवासात होते आणि आता ते तुरुंगवासात आहेत असं वाटतं – उद्धव ठाकरे
  • रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नव्हतं याच दुख वाटत होतं – उद्धव ठाकरे
  • हिंदू मार खाणार नाही, आता हिंदू प्रश्न विचारणार, मंदिर कधी बनणार – उद्धव ठाकरे
  • हिंदुच्या भावनांशी खेळ करू नका- उद्धव ठाकरे
  • निवडणुकीच्या आधी राम राम आणि नंतर आराम करतात, अनेक वर्ष झाली तरी आपल्या रामलल्लाचं मंदीर नाही बांधलं गेलं ही दुखाची गोष्ट आहे. – उद्धव ठाकरे
  • सर्वांना धन्यवाद देतो- उद्धव ठाकरे

  • उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
  • थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार

press-con

  • उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलवर परतले, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

  • उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले रामलल्लाचे दर्शन

  • उद्धव ठाकरे रामजन्मभूमीवर पोहोचले

<

  • उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घेणार राम लल्लाचे दर्शन, रामजन्मभूमीवर कडेकोट बंदोबस्त
  • देशभरातील वृत्तपत्रांमध्ये उद्धव ठाकरेच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा
  • उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती संपन्न

  • वेद मंत्रोच्चारात शरयूच्या तीरावर आरतीला सुरुवात
  • राज्यभरात शिवसैनिकांद्वारे महाआरत्या
  • मुंबईतील मंदिरांबाहेर महाआरत्यांसाठी गर्दी जमू लागली

  • लक्ष्मण किलावर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा
  • अयोध्या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही – उद्धव ठाकरे
  • हिंदू आता मार खाणार नाही, ना आता स्वस्थ बसणार – उद्धव ठाकरे
  • मंदीर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा, राम मंदिराचा अध्यादेश आणणार असाल तर माझा पक्ष शिवसेना नक्की समर्थन देणार – उद्धव ठाकरे
  • राम मंदिरासाठी किती वर्ष वाट बघणार, मंदिर कधी बांधणार याची तारिख आधी सांगा  – उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

  • झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला इथे आलोय – उद्धव ठाकरे
  • मी राजकारण करायला इथे आलेलो नाही – उद्धव ठाकरे
  • उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गौरी पूजन, गणेश पूजन आणि कलश पूजन केले
  • जय श्रीराम, जय शिवसेनाच्या घोषणांनी परिसर दणाणला
  • शिवसेना उत्तर प्रदेशचे राज्य प्रमुख ठाकूर यांनी या सोहळ्यात रामंदिर निर्माणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चांदीची वीट सुपूर्द केली.

shri-ram-bricks

  • उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या पादुकांचे पूजन 
  • उद्धव ठाकरे यांनी सोबत आणलेल्या शिवनेरीवरील पवित्र मातीच्या मंगल कलशाचे अयोध्या वासियांकडू पूजन सुरू
  • उद्धव ठाकरे यांचे लक्ष्मण किलावर जोरदार स्वागत, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणला
  • लक्ष्मण किला बाहेर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तुफान गर्दी
  • उद्धव ठाकरे यांच्या सन्मान सोहळा व आशिर्वादोत्सवाला सुरुवात

  • उद्धव ठाकरे लक्ष्मण किलाकडे रवाना

uddhav-thackeray-ayodhya-1

  • लक्ष्मण किला येथे संतमहंत, शिवसैनिकांची गर्दी

laxman-kila-1

  • उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेश सरकारकडून झेड प्लस सुरक्षा
  • लक्ष्मण किला येथे होणाऱ्या सोहळ्यात रामभक्त हनुमानाच्या वेशात दाखल झाला आहे. पाहा व्हिडीओ

  • उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलमध्ये पोहोचले, काही वेळातच लक्ष्मण किलावर पोहोचणार
  • लक्ष्मण किलावर मंत्र पठणाला सुरुवात, संताकडून पुजनाला सुरुवात
  • उद्धव ठाकरे लक्ष्मण किलासाठी रवाना
  • ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचे स्वागत
  • शिवसेना मंत्र्यांकडून उद्धव ठाकरे व कुटुंबीयांचे स्वागत
  • उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचले

  • शिवसेनेचे सर्व नेते विमानतळावर दाखल
  • फैजाबाद एअरपोर्टवर फुलांची सजावट
  • शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज, फैजाबाद विमानतळावर फुलांच्या पायघड्या
  • संपूर्ण अयोध्येत जागोजागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची पोस्टर्स, पाहा व्हिडीओ

  • सन्मान सोहळा व आशिर्वादोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची क्षणचित्रं
  • पाहा अयोध्येतील आशिर्वादोत्सवाच्या तयारीचा व्हिडीओ

  • पुण्यात तुळशीबागेतील राम मंदिरामध्ये शिवसेना प्रवक्त्या आमदार निलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

  • उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना…

  • उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येस निघाले, कलिना गेटजवळ पोहोचले
  • शरयू तीरावर ‘जय श्रीराम’, ‘हर हिंदू की यही पुकार पहिले मंदिर फिर सरकार’ च्या घोषणा
  • ‘मातोश्री’ बाहेर मीडियाची गर्दी, पोलीस मोठ्याप्रमाणावर तैनात
  • शिवसैनिकांच्या दोन ट्रेन अयोध्येत पोहोचल्या
  • घोषणा: जो नाही रामाचा, तो नाही कामाचा… , जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा…
  • उद्धव ठाकरे विशेष विमानाने अयोध्येत पोहोचणार

मुंबईत आज ठिकठिकाणी महाआरत्या

Photo:- पाहा अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी

शिवसेनेची कsssडक तयारी

  • उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी शिवसेन नेते , खासदार संजय राऊत यांच्याशी खास बातचित

  • संपूर्ण देशातील मीडियाचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे
  • मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक अयोध्येत दाखल
  • लखनौपासून अयोध्या नगरीपर्यंत स्वागताचे प्रचंड मोठे फ्लेक्स
  • शिवसेना नेत्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली… शुक्रवारी रात्री पाहणी केली तेव्हाची दृश्य खास सामनाच्या वाचकांसाठी

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी पूर्ण