पुलपिट या सर्वात उंच कड्यावर मिशन इम्पॉसिबलचे स्क्रिनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुलपिट

नुकताच टॉम क्रूझचा मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट हा चित्रपट प्रदर्शित झाला असून नॉर्वेमधील पुलपिट क्लिफवर या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्याचे पॅरामाऊट पिक्चरने ठरविले आहे. पुलपिट हा सर्वात उंच कडा असून त्याची उंची दोन हजार फूट इतकी आहे. पुलपिट कडेवरच या चित्रपटातील एक साहसी दृश्य शूट करण्यात आल्यामुळे येथेच चित्रपटाचे स्क्रिनिंगही करण्यात आले. याची जाहिरात दिल्यानंतर अवघ्या काही मिनीटांतच तिकिटांची विक्री झाली. हजारो फूट उंच असलेली कडा सर करून मग तिथेच चित्रपट पाहण्याची भन्नाट कल्पना प्रेक्षकांना खूपच आवडली.

पुलपिटवर चित्रपट पाहण्याची संधी ठराविक दोन हजार चाहत्यांना मिळाली. मग काय चार तासांचा ट्रेक करत हजारो चाहते कडेच्या सर्वात वरच्या भागात पोहोचले. मोठी स्क्रिन तेथे लावण्यात आली होती. चित्रपटांसाठी जर टॉम स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो तर मग आम्ही का नाही…? असे म्हणत अनेकांनी हा रोमांचकारी अनुभव घेतला.