अनिल परब यांना दिलासा साई रिसॉर्टप्रकरणी जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी दापोली दिवाणी न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब आणि सदानंद कदम यांना जामीन मंजूर केला आहे. परब आणि कदम हे आज दापोली न्यायालयात हजर होते.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टचे प्रकरण न्यायालयात असून परब आणि कदम यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दोघेही आज न्यायालयात हजर राहिले. यावेळी अनिल परब आणि कदम यांना न्यायालयाने 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढील सुनावणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास : परब
रत्नागिरी जिह्यात वेगवेगळ्या सहा केसेस माझ्यावर दाखल आहेत. याबाबत तपास यंत्रणांनी तपासही केलेला आहे. त्यास मी सहकार्य करत असून माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि मी निश्चितपणे माझे निर्दोषत्व सिद्ध करेन, असा विश्वास अनिल परब यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.