…तर अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू, बच्चू कडूंचे भंडाऱ्यात खळबळजनक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱयांना त्रास दिल्यास अधिकाऱयांना सोडणार नाही. शेतकरी अधिकाऱयांकडे भीक मागत नाहीत. शेतकऱयांना त्रास दिल्यास अधिकाऱयांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे खळबळजनक विधान आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी भंडाऱयात ‘प्रहार’ पक्षाच्या वतीने वन विभागावर काढण्यात आलेल्या गदर मोर्चाच्या वेळी केले.