कार्यकर्त्यांना चहा पाजायला पैसे नाही, मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार

3197


विधानसभा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक  यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे आर्थिक कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ashok-murtad

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मुर्तडक यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मतदारसंघासाठी ऐन वेळेला उमेदवार न मिळाल्याने आपण उमेदवारी अर्ज भरला. परंतु आर्थिक कारण असतं. 10 कार्यकर्त्यांना घेऊन जरी आपण प्रचाराला निघालो तर चहा पाजावा लागतो. एक चहा आता 20 रुपयांना मिळतो. पाच जणांना चहा पाजायचा तर 100 रुपये लागातात. जर 500-600 कार्यकर्त्यांना न्यावे लागेल तर आर्थिक बाजू सांभाळावी लागेल.” म्हणून आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे मुर्तडक  यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या