
सामना ऑनलाईन, बेगुसराय
बिहारमधील नायारण पीपर ककराहा विद्यालयात घुसून 4 बदमाशांनी एका विद्यार्थिनीचं बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्याचा कट रचला होता. सकाळी साडेदहा वाजता चार बदमाश या शाळेत घुसले होते. मुख्याध्यापिकेला त्यांनी बंदूकीचा धाक दाखवत ही विद्यार्थिनी कुठे आहे असा प्रश्न विचारला, त्यावर ही विद्यार्थिनी आली नसल्याचं या मुख्याध्यापिकेने सांगितलं. घाबरलेली मुख्याध्यापिका भोवळ येऊन खाली पडली. त्यांना चक्कर येऊन पडताना बघितल्यानंतर शाळेतील मुलं आरडा-ओरडा करायला लागली. हा आरडाओरडा ऐकल्यानंतर शेतात काम करणाऱ्या महिला शाळेत आल्या आणि त्यांनी या बदमाशांना चोपायला सुरुवात केली.
3 criminals went to a school, asked a teacher for a particular student&aimed a pistol at her. This created panic in school. Hearing the noise,villagers gathered & to save teacher & the student, beat the 3, injuring them. One died on spot, other 2 died in hospital: ADG (HQ), Bihar pic.twitter.com/rApipIbRc2
— ANI (@ANI) September 8, 2018
शाळेत काहीतरी गडबड सुरू असल्याची बातमी काही मिनिटांमध्ये गावात पसरली. काही मिनिटांतच शाळेबाहर मोठ्या संख्येने लोकं जमली. त्यातील बहुतांश लोकांनी महिलांसोबत या गुंडांना मारायला सुरुवात केली. गुंडांपैकी एक जण कसाबसा जीव वाचवून तिथून पळून गेला. मात्र उरलेल्या तीन गुंडांचा जागीच मृत्यू झाला.



























































