मोबाईल चोरी करणारा अटकेत

शहरातील विविध भागांत मोबाईल चोरी करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केले. त्याच्याकडून 5 मोबाईल आणि दुचाकी असा मिळून 81 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रभाकर रमेश सिंग (रा. ताडीवाला) रोड असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पथक कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मोबाईल चोरी करणारा चोरटा बोट क्लबरोड नारंगी बाग परिसरात थांबल्याची माहिती पोलीस नाईक गोरे आणि शिपाई पटेल यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रभाकर सिंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

चौकशीत त्याने मोबाईल बोट क्लब रोड, पुणे स्टेशन परिसर, मार्केटयार्ड परिसरातून चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, यशवंत आंब्रे, गजानन सोनुने यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या