
सोशल मीडिया हे सध्याच्या काळात एक नवीन माध्यम म्हणून विकसित होत आहे. विशेषतः कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करून अनेकांनी आपल्या उद्योग व्यवसायाला आधार दिला आहे. पण, याचा गैरवापरही होताना दिसतो. अशाच प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या एका मॉडेलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या मॉडेलचं नाव इव्हॉन मचाडो असं आहे. ती मेक्सिकोची प्रसिद्ध मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ आणि फोटोंची चर्चा असते. पण, तिला नुकतीच सोशल मीडियावरून अंमली पदार्थ विकल्यामुळे अटक करण्यात आली आहे. यात तिचा प्रियकर फर्नांडो अन्टोनियोचाही समावेश आहे.
View this post on Instagram
इव्हॉनच्या नावाची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करू लागली. त्या फोटोंमध्ये अंमली पदार्थांसोबतच्या फोटोंचाही समावेश होता. त्यामुळे पोलिसांचं लक्ष तिथे वेधलं गेलं. तिचा प्रियकर फर्नांडो याला एल चॅटो म्हणूनही ओळखलं जातो. तो मॅक्सिको शहरातील युनियन टेपिटो क्रिमिनल कार्टल या गँगचा मुख्य आहे. ही गँग तेथील अनेक हत्यांमध्ये सहभागी आहे. हे दोघेही एका नाईटक्लबमध्ये ड्रग्ज वाटत असताना त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना अटक केली.
या दोघांकडे गांजाच्या 106 पुड्या आणि कोकेनच्या 42 पुड्या मिळाल्या आहेत. तर त्यांच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. इव्हॉन ही सोशल मीडियाचा वापर करून ड्रग्जचे व्यवहार करत असल्याचं उघड झालं आहे.



























































