मोदी सरकार! बघा, जग काय म्हणतंय?

 

मोदी सरकार आणि भाजपने ‘अब की बार 400 पार’ म्हणत निवडणुका जिंकण्यासाठी दडपशाही चालवली आहे. विरोधी आवाज चिरडून टाकला जात आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार असे मुद्दे दाबले जात आहेत. निवडणूक यंत्रणेवरही दबाव आहे. यावरून जगभरातील माध्यमांत मोदी सरकारवर झोड उठवली जात आहे. त्याचे मथळेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि हिंदुस्थानातील दूरसंचार क्रांतीचे एक प्रणेते सॅम पित्रोदा यांनी ट्विटरच्या माध्यमातून समोर ठेवले आहेत.

निवडणुकांत विरोधकांचा आवाज दडपून, विजय निश्चित करणे लोकशाहीला धोकादायक.

* जेकोबिन मासिक

लोकशाहीने दिलेल्या अधिकारांवर आणखी हल्ले करण्याची तयारी.

भाजप हा जगातील सर्वात निष्ठूरपणे कार्यरत असणारा राजकीय पक्ष आहे
का? लोकशाही चांगल्या स्थितीत नाही.

हिंदुस्थानातील लोकशाही आता नावापुरती उरली आहे.

मोदी म्हणजे खोटेपणाचे मंदिर
जागतिक लोकशाहीचा अंत म्हणजे मोदींचा हिंदुस्थान

हिंदुस्थानातील निवडणुकीच्या निकालामुळे असहिष्णुता वाढेल का? असा सवाल डय़ूश वेले या जर्मन वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.

मोदींशिवायही हिंदुस्थानचा विकास झपाट्याने होऊ शकतो.

हिंदुस्थानातील कायद्याचे राज्य कुठे गेले? कायदा आणि सुव्यवस्थेचेही धिंडवडे निघाल्याचेच दिसत आहे.

हिंदुस्थानी लोकशाही धोक्यात असून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू राहण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदींचा अनुदारमतवाद हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीला बाधा पोहोचवू शकतो. हिंदुस्थानचा आर्थिक कणाच त्यामुळे मोडू शकतो.

मोदींचा पक्ष हिंदुस्थानातील विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ‘हुकूमशाही तंत्र’ वापरत आहे.

* कन्वर्सेशन

हिंदुस्थानातील यंदाची निवडणूक कितपत निष्पक्ष असू शकते? याबाबत शंका आहे.

मोदींनी हिंदुस्थानी लोकशाहीला सहनशीलतेच्या सीमेपार ढकलले आहे का?

मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ने रोजगार निर्मिती केली नाही. उलट बेरोजगारी प्रचंड वाढली.

मोदी आणि हिंदुस्थानची हुकूमशाहीकडे घसरण याबद्दल बायडेन गप्प का आहेत? हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून अनेक करार झाले. मात्र बायडेन यांनी हिंदुस्थानातील सद्यस्थितीबद्दल अवाक्षर काढलेले नाही.

* हिंदुस्थानातील या निवडणुका म्हणजे सबकुछ मोदीच असल्याचे मोदी भासवत आहेत.

* प्रगतशील दक्षिण हिंदुस्थान मोदींना नाकारत आहे.

* अब्जपती राजवट हिंदुस्थानला हुकूमशाहीकडे ढकलते आहे.

* हिंदुस्थानातील मतदान यंत्रांमुळे अनेक प्रश्न उपस्थित.

* विरोधकांवर वरवंटा फिरवण्याचे मोदींचे राजकारण हिंदुस्थानी लोकशाहीला मारक.