मोदी सरकारची पोलखोल, नोकरी देण्यात रेल्वे अयशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक रेल्वे

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशवासीयांना अच्छे दिनाबरोबरच नोकरीचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची पोलखेल झाली आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन मोदींनी जनतेला दिले होते. पण 2008 पासून 2018 पर्यंत निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्त्याच झालेल्या नाहीत, अशी खळबळजनक माहिती महितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

जगातील सर्वाधिक रोजगार देणारी संस्था म्हणून हिंदुस्थानी रेल्वेचे नाव आहे. पण माहिती अधिकाराच्या अंतर्गत हाती आलेल्या माहितीनुसार 2008 पासून 2018 पर्यंत एकही वर्षात जेवढे कर्मचारी निवृत्त झाले तेवढी त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्याची भरतीच झालेली नाही असे समोर आले आहे. यामुळे आजही रेल्वेतील 3 लाख पद रिक्त आहेत. ही आकडेवारी पाहीली तर लक्षात येते की एनडीए सरकार आणि यूपीए सरकार यांची अवस्था सारखीच आहे. त्यातही रेल्वेतील भरतीची संख्या मोदी सरकारच्या काळात घटली आहे. 2018 नोव्हेंबर पर्यंत रेल्वेमध्ये क आणि ड श्रेणीमध्ये 2,66,790 पद रिक्त होती. तर 2016-17 मध्ये रेल्वेत एकूण 13,08,323 कर्मचारी कार्यरत होते. हे पाहता नोव्हेंबर 2018 पर्यंत रेल्वेत 10,41,533 कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान 2008-09 साली रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 13,86,011 एवढी होती. पण मोदी सरकार आल्यानंतर रेल्वे भरतीची संख्या घटली. 2014- 15 या सालामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचा आकडा 59,960 होता. तर त्यांच्या जागी नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 15,191होती. तर 2015-16 मध्ये निवृत्त कर्मचारी संख्या 53,654 आणि नवीन भरती झालेल्यांचा आकडा 27,995 एवढी आहे. तर 2016-17 मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या 58,373 होती तर नवीन भरती झालेल्यांचा आकडा 19,587 होता. 2017-18 मध्ये 19,100 नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. पण त्यावेळी निवृत झालेल्या कर्मचाऱ्यांचे आकडे मात्र उपलब्ध झालेले नाही.

यूपीए सरकारच्या कार्यकाळात रेल्वेमध्ये 2007-08 साली निवृत्त कर्मचाऱ्यांचा आकडा 42,149 होता. पण नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा उपलब्ध नाही. तर 2008-09 साली निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या 40, 290 होती. तर नवीन नियुक्त्या अवघ्या 13,870 झाल्या होत्या. याप्रमाणेच 2009-10 मध्ये 41,372 कर्मचारी निवृत्त झाले.तर 11,825 नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली. तर 2010-11 मध्ये 43,251ही निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या होती. तर 5,916 नवीन भरती करण्यात आली. 2011-12 मध्ये रेल्वेत 44,360 कर्मचारी निवृत्त झाले. तर 23,292 नवीन भरती झाली. 2012-13 साली 68,728 कर्मचारी निवृत्त झाले. तर 28,467 नवीन भरती झाले. तर 2013-14 मध्ये 60,728 कर्मचारी निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी 31, 805 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.