पंतप्रधान मोदी विष्णूचा 11 वा अवतार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा 11 वा अवतार असल्याचा जावई शोध भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लावला आहे. वाघ यांनी ट्वीट करून मोदींना विष्णूचा अवतार म्हटले आहे. तसेच मोदी हे देशाचे प्रधानसेवक आहेत, ते ज्याप्रमाणे देशाची सेवा करत आहेत त्यामुळे ते देवासमान असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. तसेच याच भावनेतून मी त्यांना विष्णूचा 11 वा अवतार मानतो असे त्यांनी म्हटले.

wagh-tweet

पंतप्रधान मोदी यांना या पूर्वी देखील भाजप नेत्यांनी विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांनी मोदी हे विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले होते. दिल्लीतील स्प्रिंग फीवर या साहित्य संमेलनात यांनी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोदी हे विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले होते.