हिंदुस्थानशी मैत्री दृढ करण्यासाठी जपान उत्सुक !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टोकियो

हिंदुस्थान एक जागतिक शक्तीच्या रुपाने समोर येत आहे. पॅसिफिक महासागर क्षेत्रात जपान हिंदुस्थांसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी आणि उभय देशातील मैत्री दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन धावणारच असा विश्वास व्यक्त करत ज्यादिवशी ही ट्रेन धावेल तो दिवस हिंदुस्थान -जपान यांच्या मैत्रीतील नव्या पर्वाचा आरंभ असेल असे प्रतिपादन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले.हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याच्या प्रारंभाप्रसंगी आबे बोलत होते. सध्या पंतप्रधान मोदी हे जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानचे उत्तम नेते असल्याचे सांगत आबे म्हणाले, जपान आणि हिंदुस्थानच्या संबंधातून जगाला खूप काही देण्याची क्षमता असल्याचे नरेंद्र मोदींचे मत आहे.उभय देशांत सुरक्षा, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, पर्यावरण आणि पर्यटनासारख्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढेल. जपान हिंदुस्थानाचा आर्थिक विकास आणि पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही सर्व क्षेत्रात चांगल्या स्थितीत आहोत आणि जपान हिंदुस्थानची आर्थिक वृद्धी आणि जपानच्या सर्वोत्कृष्ट तंत्राचा वापर करत हायस्पीड रेल्वे, भूमिगत मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या दिवशी बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावतील तो दिवस हिंदुस्थान -जपानच्या मैत्रीचा चमकता तारा सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.