
दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार पत्र लिहून मदतीची याचना केली. एका खासदाराच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हे डेलकर यांना तातडीने मदत करू शकले असते परंतु त्यांनी केलेले दुर्लक्ष जाणीवपूर्वक होते का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.
लोकसभेच्या हक्कभंग समितीमध्ये डेलकर यांनी आपले गाऱहाणे मांडताना आपल्या मनात असलेले आत्महत्येचे सूतोवाच केले होते का याबाबत लोकसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
भाजप नेते, दादरा-नगर हवेलीच्या केंद्रीय अधिकाऱयांकडून छळ होत असून सातत्याने अपमानित केले जात असल्याचे डेलकर यांनी नमूद केले होते. 20-20 वर्षांपूर्वीचे त्यांचे संबंध नसलेले गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहेच पण ज्या गुह्याशी त्यांचा संबंध नाही व आरोपपत्रदेखील दाखल झालेले आहे अशी प्रकरणे पुन्हा उघड केली जात आहेत. पुटुंबाला जेलमध्ये टापू अशा धमक्या दिल्या जात आहेत असे पत्र नरेंद्र मोदी व अमित शहा यांना दोनदा पाठवले होते. लोकसभा सभापतींनाही त्यांनी पत्रे पाठवली होती. संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनाही पत्र पाठवले होते. 12 फेब्रुवारी 2021 रोजी लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर मोहन डेलकर यांच्या तक्रारीची सुनावणी झाली. या समितीसमोर मोहन डेलकर यांनी या सर्व समिती सदस्यांसमोर त्यांच्यावरील मानसिक आघाताची जाणीव करून दिली होती. तसेच त्यांच्यासमोर खासदारकीचा राजीनामा देणे किंवा आत्महत्या करणे हे दोनच पर्याय असल्याचे सूतोवाच केले होते, अशी माहिती समजते, असेही सावंत म्हणाले.































































