आयपीएल 2024 सुरू व्हायला अवघा एक महिना उरला आहे. या दरम्यान जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा यंदाची आयपीएल खेळणार नसल्याचे समोर आले आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पायावर शस्त्रक्रीया करण्यासाठी शमी लवकरच इंग्लंडला जाणार आहे.