आयपीएल राऊंडअप – सिराज थकलाय, विश्रांती द्या

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराज मानसिकदृष्टय़ा थकलेला वाटतोय. त्यामुळे त्याला तात्काळ विश्रांती देण्याची गरज असल्याचा सल्ला हिंदुस्थानचा माजी फिरकीवीर हरभजन सिंगने दिला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सहा सामन्यात त्याला केवळ चार विकेटच टिपता आल्या आहेत. त्यामुळे हरभजनच्या मते सिराज थकलेला वाटतोय, जर त्याला फॉर्ममध्ये परत यायचं असेल, तर विश्रांती देण्याची गरज आहे. सिराज थकला असल्याचे वारंवार दिसतेय. त्याचं शरीर आणि त्याचा मेंदू दोघांनाही विश्रांतीची गरज आहे. जेव्हा एखादा गोलंदाज फॉर्मसाठी झगडत असतो, तेव्हा त्याच्यासाठी विश्रांती हेच रामबाण औषध असतं, असं परखड मत हरभजन सिंगने व्यक्त केलेय.

हिंदुस्थानी संघात गिलख्रिस्टला हवाय पंत आणि सॅमसन

हिंदुस्थानच्या टी-20 संघात सर्वात मोठे युद्ध यष्टिरक्षणासाठी रंगणार आहे. सध्या त्या एका जागेसाठी एक नव्हे तर पाच-पाच खेळाडू शर्यतीत आहेत आणि लोकेश राहुल या यादीतून निसटलाय. पण ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन हे तिघे जोरदार खेळ करत आहेत. महान यष्टिरक्षक आणि धडाकेबाज सलामीवीर असलेल्या अॅडम गिलख्रिस्टने हिंदुस्थानी संघात यष्टिरक्षणासाठी ऋषभ पंतला आपली पसंती दिली आहे. मात्र या संघात मी संजू सॅमसनसारख्या धडाकेबाज खेळाडूलाही संधी देईन, असे म्हणत एक नव्हे तर दोघांची 15 सदस्यीय संघात निवड केली आहे. तसेच इशान किशनच्याही फलंदाजीच्या प्रेमात आहेत. मात्र तो त्याची तिसरी पसंत आहे. जर निवड समितीने पंतबाबत आपला निर्णय अंतिम केला नसेल तर तो आधी करावा, असेही तो म्हणाला. या तिघांशिवाय ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्याही नावांचा विचार होण्याची शक्यता असून सध्या दोघेही फॉर्मसाठी झगडत आहेत.

दिल्लीचा जायंट विजय, कुलदीपचे विजयी पुनरागमन तर मॅकगर्कचे झंझावाती पदार्पण

आयपीएल गुणतालिका

संघ         सा.   वि.    .      गुण     नेररे

राजस्थान  5  4  1  8   0.871

कोलकाता 4  3  1  6   1.528

चेन्नई       4  2  2  4   0.517

लखनऊ     5  3  2  6   0.436

हैदराबाद  5  3  2  6   0.344

गुजरात     6  3  3  6   -0.637

मुंबई        5  2  3  4   -0.073

पंजाब      5  2  3  4   0.196

दिल्ली      6  2  4  4   0.975

बंगळुरू     6  1  5  2   -0.124

टीप  – सा. – सामना, वि. – विजय,

.  – पराभव, नेररे – नेट रनरेट

(ही आकडेवारी दिल्ली-लखनऊ सामन्यापर्यंतची आहे.)

IPL 2024 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज भिडणार