बाबासाहेबांनी दिलेल्या इशाऱ्याची मोहन भागवतांनी आठवण करून दिली

3137

नागपूरमध्ये नवोत्साह 2020 या कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी स्वयंसेवकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. या भाषणात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान प्रदान करत असतेवेळी केलेल्या भाषणादरम्यान दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली.

मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगिनी निवेदिता यांच्या काही वाक्यांचाही उल्लेख केला. भाषणादरम्यान सरसंघचालक म्हणाले की ‘आपण स्वतंत्र झालो आहोत, राजकीय दृष्ट्या आपण विभागले गेलो असलो तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. देशावर आपले राज्य आहे. मात्र हे स्वातंत्र्य टीकून रहावे आणि राज्यगाडा व्यवस्थित चालावा यासाठी सामाजिक शिस्तीची गरज आहे’

मोहन भागवत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील काही वाक्यांचा उल्लेख करत म्हटले की देशाला संविधान प्रदान करत असताना त्यांनी संसदेमध्ये दोन भाषणे केली होती. ज्यात ते म्हटले होते की ‘आता आपल्या देशात जे काही होईल , त्याला आपणच जबाबदार असू. काहीतरी राहीलंय, काही झालं नाहीये, उलंट-सुलट झालं तर आपण ब्रिटीशांना दोष देऊ शकणार नाही. यामुळे आपल्याला बराच विचार करावा लागणार आहे’. संरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की जेव्हा आपण गुलाम होतो तेव्हा जसे वागत होतो तसं वागून चालणार नाही. नागरिकांनी पाळायच्या शिस्तीची सवय ही अशा कार्यक्रमांमुळे अंगवळणी पडते. सामाजिक शिस्तीची सवय अशा कार्यक्रमांमुळे लागते.

आपली प्रतिक्रिया द्या