प्रत्येकाने तीन मुले जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे आवाहन

‘लोकसंख्या नियंत्रण जितके गरजेचे आहे, तितकेच लोकसंख्या पुरेशी असणेही गरजेचे आहे. कुटुंब व्यवस्था टिकावी, देशाच्या सुरक्षेची चिंता राहू नये यासाठी नागरिकांनी किमान तीन मुले जन्माला घालावीत,’ असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत आयोजित संमेलनाला संबोधित करताना भागवत यांनी हा मुद्दा मांडला.