सोलापूर जिह्यातील आठ बाजार समित्यांचे चित्र स्पष्ट; मोहोळ बाजार समिती बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत असून, मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे, तर दुधनी बाजार समितीत दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. अक्कलकोट, दुधनी, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, कुर्डुवाडी, अकलूज बाजार समित्यांसाठी निवडणुका होत आहेत.

अक्कलकोटमध्ये 48 उमेदवार रिंगणात

अक्कलकोट बाजार समितीसाठी 48 उमेदवार, तर दुधनीसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अक्कलकोट बाजार समितीसाठी 18 जागा असून, 48 उमेदवारांत लढत होत आहे. दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी गटातून दोन जागा बिनविरोध झाल्या असून, 16 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजीमंत्री म्हेत्रे गटाचे सातलिंगप्पा परमशेट्टी आणि चंद्रकांत येगदी हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. सत्ताधारी माजीमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या पॅनलविरोधात आमदार सचिन कल्याण शेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे एकत्र आले आहेत, तर मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.