कोरोनासाठी मोलनुपिरावीर फक्त वयोवृद्धांना द्या, महिलांना नको! होणाऱ्या संततीसाठी धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोलनुपिरावीर हे औषध कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात, आयसीयूत भरती होण्यापासून वाचवत असले तरी ते फक्त वयोवृद्धांनाच द्यावे, महिलांना देऊ नये असा सल्ला नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) दिला आहे. हे औषध विवाहित पुरुष आणि महिलांना दिल्यास त्यांना होणाऱया संततीवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात अशी भीता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘एनटीएजीआय’चे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी हा सल्ला दिला आहे. मोलनुपिरावीरचा विनाकारण वापर करणे धोकादायक ठरू शकते असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या औषधाच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली होती. हे औषध ओमायक्रोनवरही प्रभावी असल्याचा तज्ञांचा दावा आहे.

मोलनुपिरावीर हे औषध प्रामुख्याने सर्दी-खोकल्यासाठी बनवण्यात आले होते. हे पॅप्सूल स्वरूपात आहे. मर्क आणि रिजबॅक या पंपन्यांनी हे औषध बनवले आहे. हे औषध 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर रुग्णांना दिले जाणार आहे. कोरोनाच्या विषाणूंची वाढ रोखण्यात ते प्रभावी असल्याचा दावा केला जात असला तरी राष्ट्रीय कोविड टास्क पर्ह्सच्या सदस्यांनीही या औषधाचा कोविड प्रतिबंधक औषधांमध्ये समावेश करणे तितकेसे फायदेशीर नसल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनीही गेल्या आठवड्यात मोलनुपिरावीरच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती.