
सरकारी कार्यालयात रजिस्ट्रीसाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची पैशांनी भरलेली बॅग पळवल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या माकडाने झाडावर चढून नोटांचे बंडल खाली फेकल्याने येथे अक्षरशः पैशांचा पाऊस पडला. त्यामुळे काही काळ या परिसरात गोंधळ निर्माण झाला.
कासिमपूरचे भगवान हे येथे जमीन विक्रीच्या कामासाठी येथे आले होते. त्यांच्या बॅगेत 4 लाख रुपये होते. माकडाने पैशांची बॅग पळवल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. झाडावरून माकडाने नोटांचे बंडल फेकताच त्या गोळा करण्यासाठी लोकांचीही गर्दी झाली. अखेर लोकांना कशीबशी विनवणी करून भगवान यांनी त्यांच्याकडून पैसे मिळवले. दुसऱ्या झाडावर उडय़ा मारण्याच्या नादात माकडाच्या हातातून बॅग निस़टली अन् भगवान यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.




























































