
चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा एकदा मेअखेरपर्यंत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही सेवा ऑगस्ट 2025 मध्ये भीषण दुर्घटना घडल्यापासून बंद आहे. संपूर्ण मार्गिकेचे अत्याधुनिकीकरण, नव्या मोनोरेल गाड्या सेवेत दाखल करून सुरक्षित प्रवास करण्यासाठी काही कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्यांसाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



























































