मान्सून अंदमानात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने अखेर शुक्रवारी मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान खात्याने त्याची घोषणा केली असून महाराष्ट्रासह इतर राज्यांत यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टय़ाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अंदमान- निकोबार बेटावर मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. यंदा सरासरी 103 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने याआधीच वर्तविला आहे. दरम्यान, येत्या 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यानंतर साधारण दहा दिवसांत तळकोकणात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.