
राज्यात गुटखाबंदी असतानाही आतापर्यंत राज्यभरात 450 कोटींपेक्षा अधिक किमतीचा गुटखा व संबंधित साठा जप्त केला आहे. 10 हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, गुटखा तस्करी आणि विक्रीला खतपाणी घालणाऱया गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते का, यासाठी विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
विधान परिषदेत श्रीकांत भारतीय यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले, राज्यात गुटखाबंदी, पान मसाला उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी असतानाही गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमधून पंटेनर्स महाराष्ट्रात येतात आणि सर्रासपणे विक्री करतात. सरकारकडून फक्त विकणाऱयावर कारवाई होते. परंतु, हा गुटखा येतो कुठून, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भारतीय यांनी केली.


























































