शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल  

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. शक्तिपीठ महामार्गाची काहीच गरज नाही, त्यातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? असा सवाल शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी आज विधानसभेत केला.

शेतकरी आत्महत्या करताहेत, तरी सरकार त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही. व्यापाऱ्यांना जीएसटी माफ केला जातो, पण शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. असे सांगतानाच, शक्तिपीठ महामार्ग नेमका कुणाला हवाय? असा सवाल कैलास पाटील यांनी सभागृहात विचारला.