गाडीला कट का मारल्याचे विचारत मोटारीतील लाखो रुपये लंपास, वाघोलीतील घटनेने खळबळ

गाडीला कट का मारला म्हणून चालकास बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी मोटारीतील साडेतेरा लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना वाघोलीतील उबाळेनगर परिसरात घडली. याप्रकरणी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील 46 वर्षाच्या व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कारमधील तीन ते चार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी वाघोलीतील उबाळेनगरच्या पंचशील स्टील दुकानासमोर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे निरा येथे एका व्यवसायिकाकडे नोकरीला आहेत. त्यांच्या मालकाचा स्लायडिंगचा व्यवसाय आहे. 30 एप्रिलला त्यांच्या मालकाने सणसवाडी येथून माल आणण्यासाठी पैसे देऊन पाठविले होते. त्यानुसार ते माल आणण्यासाठी जात असताना उबाळेनगर परिसरात  मोटारीतील तीन ते चार चोरट्यांनी त्यांना अडविले.

गाडीला कट का मारला, आमच्या गाडीचे नुकसान झाले असे म्हणत बोलण्यात गुंतविले. त्यांना गाडीचे नुकसान झाल्याचे दाखविण्यासाठी पाठीमागे घेऊन गेले. त्यावेळी आरोपींच्या साथीदारांनी संगनमत करून तक्रारदार यांनी स्टेअरिंगच्या खाली पिशवीत ठेवलेले 13 लाख 50 हजार रूपयांची चोरी केले. तक्ररादार  मोटारीत आल्यानंतर त्यांना पैशाची बॅग दिसली नाही. त्यांनी शोधा-शोध केली. पण, पैसे मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी मालकाला ही माहिती दिली. गावी गेल्यानंतर मालकाच्या सांगवण्यावरून त्यांनी आता तक्रार दिली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे तपास करत आहेत. ल

आपली प्रतिक्रिया द्या