पाकिस्तानमधून 33 हजार अफगाणी निर्वासित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून आतापर्यंत 33 हजारांहून अधिक अफगाण नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. मागील वर्षापासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. पंजाब प्रांतातील पोलीस महासंचालक अब्दुल करीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वासितांमध्ये 13 हजार 760 मुलांचा समावेश आहे. या मुलांकडे रहिवासी पुरावा आणि अफगाणी नागरिकत्व कार्ड आहे. पोलिसांनी शहरात अफगाणिस्तानींच ओळख पटवण्यासाठी फेशियल रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. बेकायदेशीरपणे अफगाणी लोकांना शरण किंवा नोकरी देणाऱ्या घर मालक आणि व्यापाऱ्यांची चौकशी केली जात आहे.