
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 68 हजार 766 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 36 लाख 91 हजार 166 वर पोहोचली आहे. असे असले तरी देशात आतापर्यंत 28 लाख 39 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 7 लाख 85 हजार 996 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 1 टक्क्यांनी वाढले असून 76.85 टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच प्रत्येक 100 रुग्णांमागे 76 रुग्ण बरे होत आहेत. तर गेल्या 24 तासात 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 65 हजार 288 वर पोहोचला आहे.
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती खालावली आहे. गोगोदी यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सोमवारी रात्री अचानक त्यांया शरीरातील ऑक्सिजन कमी झाले होते.


























































