
वेतनधारक करदात्यांनी (ज्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची गरज नाही) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आतापर्यंत सुमारे 1 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केला आहे. आयटीआर भरण्याचा 1 कोटीचा टप्पा मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 12 दिवस आधी गाठला गेला आहे. गेल्या वर्षी 8 जुलैपर्यंत 1 कोटी करदात्यांनी आयटीआर भरला होता. आयटीआर फाईल करताना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी लवकर विवरणपत्र दाखल करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.




























































