
मुंबईत मार्चपासून धुमाकूळ घालणारा कोरोना आता मात्र परतीच्या वाटेला लागला असून कोरोनाबाधित असूनही सात हजार रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. तर फक्त 400 रुग्ण अत्यवस्थ आहेत. एपूण 7650 सक्रिय रुग्णांपैकी फक्त अडीच हजार रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणे आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत तब्बल 2 लाख 68 हजार 297 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच अनेक हॉटस्पॉट निर्माण झाले. त्यामुळे कोरोनाला रोखणे पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले, मात्र पालिकेने अहोरात्र काम करून कोरोनावर चांगलेच नियंत्रण मिळवले आहे. दिवाळीनंतर झालेली रुग्णवाढही आता नियंत्रणात आल्याने पालिकेनेही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,87,816 झाली आहे, मात्र सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 93 टक्क्यांवर गेल्याने मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. यातच कोरोनावाढीचा दरही चांगलाच कमी झाला आहे. 24 नोव्हेंबर रोजी रुग्णवाढीचा 0.32 टक्क्यांवरून 24 नोव्हेंबर रोजी 0.19 टक्क्यांवर खाली आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असल्याचे समोर आले आहे.
चाचण्यांच्या प्रमाणातील रुग्णवाढही घटली
कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे घटलेले प्रमाण मुंबईसाठी सकारात्मक ठरत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना मुंबईत कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 35 टक्के होते.
हे प्रमाण आता 4 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने दैनंदिन रुग्णांची आकडेवारीही कमी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 22 लाख 65 हजार 635 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यात एपूण 12.73 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
अशी आहे सद्यस्थिती
मुंबईत सद्यस्थितीत एपूण 7650 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 4 हजार 506 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर लक्षणे असलेल्या 2 हजार 696 रुग्णांची प्रकृतीही उत्तम असून ते धोक्याबाहेर आहेत. तर 448 क्रिटिकल रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
‘रुग्ण दुप्पट’ एक वर्षावर
कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्य़ा ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत आतापर्यंत घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, मार्गदर्शन, औषधोपचार आणि आवश्यक कार्यवाहीमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी झपाटय़ाने वाढत आहे. यामध्ये 24 नोव्हेंबर रोजी 218 दिवस असणारा रुग्ण दुपटीचा कालावधी 24 डिसेंबर रोजी तब्बल 147 दिवसांनी वाढून 366 दिवस झाला आहे.

































































