‘हे’ जगातील सर्वात महागडे पाणी…किंमत जाणून थक्क व्हाल….

पाणी म्हणजे जीवन, असे म्हटले जाते. निसर्गात पाण्याचे स्थान अनमोल आहे, कारण पाण्यावरच अन्नसाखळी आणि निसर्गचक्र अवलंबून आहे. वनस्पती, प्राण्यांना आवश्यक असलेल्या सर्वात महत्त्वाच्या पदार्थांपैकी ‘पाणी’ हे एक आहे. दैनंदिन जीवनातील प्राणीमात्रांच्या विविध प्रकारच्या गरजा भागवणारे पाणी काही देशांमध्ये अत्यंत महागड्या किमतील विकले जाते, हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल.

ऑस्ट्रेलियातील तस्मानिया येथे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची विक्री होते. धबधब्यांमधील पाणी या बाटल्यांमध्ये भरले जाते. जॉन मॉन्सियर नावाची कंपनी पाण्याच्या बाटल्या भरून त्या सीलबंद करण्याचा व्यवसाय करते. या बाटल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे बाटलीबंद पाणी फक्त श्रीमंत लोकांसाठी बनवले जाते शिवाये ते फक्त पाणी पाणी नसून चमचमणारे पाणी (स्पार्कलिंग वॉटर) आहे.

कॅनडा शहरात मिळणारे बाटलीबंद पाणी हे ग्रीनलॅंडच्या आईसबर्ग म्हणजेच हिमशिखरातून घेतले जाते. येथे झपाट्याने हिमशिखरे वितळत असतात. या हिमशिखरांतून वितळणारे पाणी या बाटल्यांमध्ये भरले जाते. या पाण्याला बर्ग असे नाव देण्यात आले आहे.

उत्तर जर्मनीत मिळणारे सीलबंद बाटल्यांमधील पाणी 181 मीटर खोल विहिरीतून काढले जाते. येथे मिळणाऱ्या बाटल्यांमध्ये फक्त 681 मिलि. पाणी असते. या बाटल्या रिडल कंपनी तयार करत असून या कंपनीची स्थापना 1756 साली झाली आहे. प्रत्यक्षात ही कंपनी ग्लासवेअर तयार करते.

स्लोव्हेनियामध्ये बाटलीबंद तयार होते. या पाण्यात भरपूर मॅग्नेशियम असते. या बाटल्यांमधील पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. हे पाणी एका खास झऱ्यातून गोळा केले जाते.

कॅनडातील एक कंपनीसुद्धी सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करते. या बाटल्यांमधील पाण्याची विक्री व्हिस्किमध्ये मिसळण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. हे पाणी अनेक नैसर्गिक झऱ्यांमधून गोळा केले जाते. हे फक्त 100 मिली. बाटल्यांमध्ये विकले जाते.

ब्राझीलमध्ये बाटलीबंद विकल्या जाणाऱ्या पाण्याची किंमत वाढते. हे पाणी धुक्यांद्वारे साठवले जाते. पाणी साठवण्याकरिता पर्वतांवर विशेष जाळी लावली जाते. त्यावर धुके चिकटते. त्यानंतर त्यातून गोळा केलेले पाणी बाटलीबंद केले जाते.

नॉर्वे येथील स्वालबार्ड येथे हिमनगातून पाणी गोळा केले जाते. येथे आर्क्टिकमध्ये तरंगणारा हिमखंड वितळण्यापूर्वी ते बाटली बंद केले जाते.

अमेरिकेत विकत मिळणारे बाटलीबंद पाणी धबधब्याद्वारे साठवले जाते. हे एका विशिष्ट प्रकारच्या काचेच्या बाटलीत सीलबंद केले जाते. या बाटल्यांवर स्वारोवस्की क्रिस्टल्स लावलेले असतात. हॉलिवूड कलाकारांना या बाटलीतील पाणी प्यायला खूप आवडते.

जर्मनीत विकत मिळणारे सीलबंद बाटल्यांमधील पाणी जुन्या विहिरीतून येते. सुरुवातीला या पाण्याच्या बाटल्यांची विक्री फक्त जर्मनीमध्ये होत असे, पण आता येथे तयार होणारे बाटलीबंद पाण्याची जगभरात विक्री होते. येथे विकली जाणारी पाण्याची बाटली दारूच्या बाटलीसारखी दिसते.

सर्वात महागडे ‘पाणी’ 

जगातील सर्वात महाग सीलबंद बाटलीतील पाणी जपानमध्ये विकले जाते. त्याची किंमत 1.15 लाख रुपये आहे. याचा अर्थ एक आयफोन खरेदी करता येईल एवढी या पाण्याच्या बाटलीची किंमत आहे.  जपानमध्ये याला नुनोबिकी पाणी म्हणतात. या बाटल्यांमधील पाणी जपानमधील कोबे भागातील झऱ्यांमधून आणले जाते. या पाण्याची बाटली स्वारोवस्की क्रिस्टल्स, सोन्याचा मुलामा आणि चमकदार पंखांनी भरलेली असते.