सर्वाधिक शतकांमध्ये सचिन, विराटनंतर रोहितचा नंबर, गांगुलीचा विक्रम मोडला

460

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पहिल्याच लढतीमध्ये ‘हिटमॅन’ रोहित शर्माने शतकी खेळी केली. रोहित शर्माचे एक दिवसीय क्रिकेटमधील हे 23 वे शतक आहे. या शतकासह रोहितने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या विक्रमाला मागे टाकले. सौरव गांगुलीच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 22 शतकांची नोंद आहे.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंचा विचार केल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 41 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक शतकांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी रोहित शर्माची वर्णी लागली आहे.

सर्वाधिक शतक करणारे सहा हिंदुस्थानी –
सचिन तेंडुलकर – 49 शतकं
विराट कोहली – 41 शतकं
रोहित शर्मा – 23 शतकं
सौरव गांगुली – 22 शतकं
शिखर धवन – 16 शतकं
विरेंद्र सेहवाग – 15 शतकं

धावांचा पाठलाग करताना शतकांचा विचार केल्यास विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराटने धावांचा पाठलाग करताना 25 शतकं ठोकली आहे. यानंतर सचिन तेंडुलकर असून त्याच्या नावार 17 शतकांची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर 12 शतकांसह ख्रिस गेल, तर 11 शतकांसह तिलकरत्न दिलशान आणि रोहित शर्मा संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या