माता न तू वैरिणी, युट्युबवर सर्च करून तीन महिन्यांच्या बाळाचा केला खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या तीन महिन्यांच्या बाळाचा खून केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे युट्युबर सर्च करून तिने बाळाचा खून केल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उज्जैनमध्ये स्वाती भटेवरा या महिलेला तीन महिन्यांची मुलगी होती. वीरती भटेवरा असे मुलीचे नाव असून ती 12 ऑक्टोबरपासून ती बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तपास केला असता घराच्या टाकीत तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली. पण जेव्हा पोलिसांनी वीरतीची आई स्वातीची युट्युब सर्चिंग हिस्ट्री तपासून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. मुलांना मारण्याचे पद्धतीने तिने युट्युबवर सर्च केल्या होत्या. आणि त्यातलेच व्हिडीओ पाहून तिने आपल्या बाळाचा खून केला.

या प्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली आहे. अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत.