
यूपीच्या गोरखपूरमध्ये कॅम्पियरगंज भागात एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. याभागातील एका गावात तीन मुलांची आई इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यासोबत फरार झाली आहे.
मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना मदतीची विनंती केली आहे. आता पोलीस महिला आणि फरार झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत. या मुलाचं वय 15 ते 16 वर्ष असल्याचं बोललं जात आहे. गावकाऱ्यांचं म्हणणं आहे की महिला आणि विद्यार्थी बऱ्याच काळापासून एकमेकांना भेटत होते. त्यांच्यात जवळीक आहे असं वाटत होतं मात्र ते हे पाऊल उचलतील असं वाटत नव्हतं. 10 मार्चच्या रात्री दोघेही अचानक गायब झालं.
या घटनेमुळे गावात एकच चर्चा सुरू आहे. गावकरी ही हैराण झाले आहेत. मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की या दोघांना शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत आहोत. बराच शोध घेऊनही हे दोघे न सापडल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनं पोलीसही चक्रावले. पोलीस दोघांचा तपास करत आहेत. लवकरच दोघांचा शोध घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.





























































