
आपल्या मुलांना चांगले वळण लावण्याचा आईचा कायम प्रय़त्न असतो. अशावेळी काहीवेळेला तिला कठोर व्हावे लागते.अशीच एक घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या मुलाला धडा शिकविण्यासाठी असे काही केले ज्याची कल्पनाही करता य़ेणार नाही.
लुईस पार्कर असे त्या महिलेचे नाव असून ती तीन मुलांची आई आहे. जिला चुकीच्या गोष्टींवर कठोर व्हावे लागते. ती आपल्या मुलांना भावनात्मक रूपाने नाही, तर कठोर पद्धतीने वागविण्यावर विश्वास ठेवते. सिंगल आई लुईसच्या म्हणण्यानुसार, काही आई-वडिल तिच्या या वागण्याला स्विकारू शकत नाही. मात्र ती तिच्या मुलाला कठिण प्रसंगातही सामना करण्यासाठी शिकवत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, लुईसचा मुलगा मायकल 14 वर्षांचा होता. त्याला स्काऊट कॅम्पमध्ये जायचे होते. मात्र तो आपली स्लीपिंग बॅग घरीच विसरला होता. तो तंबूत पूर्ण रात्र कुडकुडत झोपेल. मात्र त्यानंतरही काही विचार आला नाही. तिची स्लीपिंग बॅग द्यायला जाऊ शकत होती. मात्र तिने तसे केले नाही. मुलाला या कटू अनुभवाने नक्कीच फायदा होईल असा तिचा विश्वास होता.
लुईसच्या म्हणण्यानुसार, मायकल आता एवढा मोठा झाला आहे. तो स्वत:ची जबाबदारी घेऊ शकतो. महिलेला विश्वास होता की या अनुभवाने तो शहाणा होईल. तर मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईला भावना नाहीत, जी त्याला थंडीत कुडकुडत झोपण्यासाठी सोडून देते. पुढे मायकलने असेही सांगितले की, पुन्हा त्याने अशी चूक कधीच केली नाही.




























































