चेंबूरमध्ये खळबळ, आईसह चिमुरडय़ाचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबुरच्या लालडोंगर परिसरात आईसह तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चिखलात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. श्रुती महाडिक आणि राजवीर अशी त्यांची नावे असल्याचे समजते. ही हत्या आहे कि आत्महत्या ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

लालडोंगर येथील अल्टा विस्टा इमारतीच्या मागच्या बाजुला असलेल्या गटार भागात आज मायलेकाचा मृतदेह सापडला.  इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या सीसीटिव्ही पॅमेऱ्यात इमारतीवरून काहीतरी खाली पडताना दिसत आहे. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता श्रुती आणि मुलाचा मृतदेह सापडला. अल्टा विस्टा इमारतीत श्रुतीचे माहेर असून ती कुर्ला नेहरू नगरातल्या कामगार नगर येथे राहत होती. दोन दिवसापूर्वी श्रुती आणि रणवीर बेपत्ता झाल्याने नेहरू नगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीने हरविल्याची तक्रार दिली होती.