Motorola चा बजेट फोन Moto E7 Power लॉन्च, किंमत आणि फिचर्स…

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने (Motorola) हिंदुस्थानमध्ये आपला बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Moto E7 Power असे या बजेट स्मार्टफोनचे नाव असून हा फोन दोन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Moto E7 Power हा स्मार्टफोन हिंदुस्थानमध्येच तयार करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Moto E7 Power हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनची विक्री 26 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा फोन ब्ल्यू आणि कोरल रेड रंगात उपलब्ध असेल. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ड आणि रिटेल आऊटलेट्समध्ये तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

moto-e7-power-3

फिचर्स –

– 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी + डिस्प्ले
– स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9
– ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर
– मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणार
– 5000 mAh ची दमदार बॅटरी
– हँडसेटच्या सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले

moto-e7-power-1

कॅमेरा –

Moto E7 Power मध्ये ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

moto-e7-power-2

किंमत –

– 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएन्टची किंमत 7 हजार 499 रुपये
– 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएन्टची किंमत 8 हजार 299 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या