तोंडाला दुर्गंधी येतेय… मग आधीच सावध व्हा

तोंडाला दु्र्गंधी येतेय, थकवा जाणवतोय, वजन कमी होतंय. तर याकडे दुर्लक्ष करु नका. आधीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे टाईप -2  मधुमेहाचे संकेत असू शकतात.

सतत थकल्यासारखे वाटणे, आळस येणे आणि अचानक वजन कमी होणे हे टाईप 2 च्या मधुमेहाचे लक्षण असू शकते. या प्रकारात रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण एवढं जास्त होतं की त्यावर नियंत्रण मिळवणं कठिण होऊन जातं. त्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर होताना दिसतो. त्याने हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका वाढतो.

शरीर इन्सुलिनची निर्मिती थांबविते. याची लक्षणं लवकर लक्षात येत नाहीत. टाईप 2 मधुमेहाबाबत अद्याप कोणता उपचार सापडलेला नाही. पण आपल्या जीवनशैलीतील काही खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल करायला हवे. अशावेळी मधुमेहाची लक्षणं माहिती असतील तर त्यावर सुरुवातीलाच उपचार करणे शक्य झाले.

तोंड कोरडं पडणं आणि दुर्गंधी येणं

टाईप टू मधुमेह हा शरीरातील काही बदलांमुळे समजू शकतो. ओन्ली माय हेल्थच्या रिपोर्टनुसार याचं प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे तोंड कोरडे होणं आणि तोंडाला दुर्गंधी येणे. काही वेळाला तोंडाला दुर्गंधी येणं हे दात स्वच्छ न केल्यामुळे येऊ शकते. पण दात स्वच्छ घासूनही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे टाईप 2 मधुमेहाचा धोका असू शकतोय त्याकडे दुर्लक्ष कर नका.

वारंवार लघवीला होणे

2 मधुमेह झालेल्या व्यक्तीला वारंवार लघवीला होते. रात्री उठून लघवीला जावे लागते. ही लक्षणं जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जा. कारण तेही टाईप-2 मधुमेहाचे लक्षण असू शकते.

सतत थकवा येणे

तुम्हाला नेहमीप्रमाणे उत्साह वाटत नाही. साखरे थकल्यासारखे जाणवत असेल. आळस वाटत असेल, तर हेही टाईप-२ मधुमेहाचे लक्षण असू शकते.

वजन कमी होणे

याबरोबरच शरीराचं वजन कमी होतं आणि तुम्ही जे खाता त्याचा शरीरावर परिणाम दिसत नाही. हे देखील टाईप 2 च्या मधुमेहाचे लक्षण आहे.

धुरकट दिसणे

 डोळ्यांना धुरकटपणा वाटत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. मधुमेहाच्या दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांमध्ये हे देखील लक्षण आढळून आलेले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या