
सामना प्रतिनिधी । राहाता
भाजपला मोठाच धक्का देणारा चमत्कार चालू महिन्यातच पाहायला मिळेल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेक खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘स्वगृही’ परततील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडीबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी चर्चा केली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.



























































