…आणि राहुल गांधींनी 500 रुपये खिशात टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। भोपाळ

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे गुरुद्वारात माथा टेकायला गेले होते. यावेळी एक गमतीदार किस्सा घडला. माथा टेकल्यानंतर राहुल यांनी दानपेटीत पैसे टाकण्यासाठी खिशातून 500 रुपयांची नोट काढली. पण त्यांच्या मागे उभे असलेले खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांना पटकन आचार संहितेची आठवण करून दिली. त्यानंतर राहुल यांनी ती नोट परत खिशात टाकली. हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच टीपला. हा प्रकार पाहून सगळ्यांनाच हसू आवरेनासे झाले.

ग्वाल्हेर-चंबळ दौऱ्याची सुरुवात राहुल यांनी याच गुरुद्वारातून केली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि दीपक बावरिया हे देखील होते. गुरुद्वारात राहुल यांनी माथा टेकत नवसही केल्याचे सांगण्यात येत आहे.