
सामना ऑनलाईन । लखनौ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी अयोध्या दौर्यावर जाणार आहेत. या दौर्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले आहे. खासदार संजय राऊत यांनी योगींची भेट आज भेटली तेव्हा त्यांनी या दौर्याचे स्वागत केले.
शिवसेनापक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे जी की प्रस्तावित अयोध्या यात्रा को लेकर उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ जी से आज मुलाकात हुई। काफी सकारात्मक माहौल में हुई इस बातचीत में योगी जी ने उध्दव जी की यात्रा का स्वागत किया है। pic.twitter.com/10CguifZIE
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2019
सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 16 जून रोजी अयोध्याचा दौरा करतील, या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आदित्यनाथ यांची भेट घेतली. ही भेट सकारात्मक झाल्याचे राऊत यांनी म्हटले, तसेच योगी यांनी उद्धव ठाकरे यांचे यात्रेसाठी स्वागत केल्याचेही राऊत यांनी नमूद केले. या दौर्यासाठी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.



























































