
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लोकसभेच्या नियम समितीने खासदारांच्या गोंधळाला आवर घालण्यासाठी सभागृहातील नियम आणखी कडक केले आहेत. यापुढे खासदारांना वेलमध्ये उतरून आंदोलन करता येणार नाही. असं केल्यास त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. आसनावर उभं राहून घोषणाबाजी केल्यासही कारवाई केली जाणार आहे.




























































