
अभिनेता आर. माधवन याने रविवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून धमाका केला. आगामी ‘द चेज’ चित्रपटाचा हा टीझर असल्याचे त्याने सांगितले. सर्वात मोठे सरप्राईज म्हणजे यात क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी एका धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. एका टास्क पर्ह्स ऑफिसरच्या रूपात धडाधड गोळ्या मारताना कॅप्टन कुल माही आपल्याला दिसेल.
आर माधवनने आज टीझर शेअर केला असला तरी हा चित्रपट आहे की वेबसीरिज, की आणखी काही याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अजून सस्पेन्स वाढला आहे. टीझर शेअर करताना माधवनने लिहिलंय, एक मिशन, दोन जांबाज… एक जबरदस्त आणि धमाकेदार चेज सुरू होणार आहे.