IPL 2022 सीएसकेच्या चाहत्यांना धक्का; धोनीने कर्णधारपद सोडले, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी आता 2 दिवसांचाच कालवाधी उरला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) या मॅचनं आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या आयपीएलपूर्वी काही टीमच्या कॅप्टनमध्ये बदल झाला. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) देखील यंदा नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) गेल्या कित्येक वर्षांपासून सीएसकेचे कॅप्टन होता. मात्र आता त्याने कर्णधार पद सोडले असून रविंद्र जाडेजा याची कॅप्टन म्हणून सीएसकेने नियुक्ती केली आहे.

महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला असून उत्तराधिकारी म्हणून रविंद्र जाडेजाकडे ही धुरा सोपवली आहे, असे सीएसकेने आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद धोनीकडे होते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चार वेळा स्पर्धाही जिंकली आहे. 2016 आणि 2017 मध्ये चेन्नईवर बंदी घालण्यात आली तेव्हा तो पुणे रायझिंग या संघाकडून खेळला होता. मात्र पुनरागमनानंतर त्याने 2021 मध्ये चेन्नईला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवले होते.

आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत 204 लढतींमध्ये टीमचे नेतृत्व केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीमने 121 लढतींमध्ये विजय मिळवले आणि 82 पराभव पाहिले. धोनीच्या विजयाची टक्केवारी 59.60 एवढी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केलाय.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, दिपक चहर, अंबाती रायडू, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश तीकशाना, राजवर्धन हंगरेकर, सिमरजीत सिंह, डेवन कॉन्वे, ड्वेन प्रेटोरियस, मिशेल सँटनर, एडम मिल्ने, सुभ्रांतु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी. हरिनिशांत, एन. जगदीशन, भगत वर्मा, क्रिस जॉर्डन

रिटेन केलेले खेळाडू – ऋतुराज गायकवाड, मोईन अली, महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जाडेजा

IPL 2022 ‘अनसोल्ड’ खेळाडूंचे नशिब फळफळलं, कोट्यवधींची रक्कम घेऊन मैदानात उतरणार