IPL 2020 धोनीने केले मराठमोळ्या ऋतुराजचे कौतुक

चेन्नई सुपरकिंग्जचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आहे. पण उर्वरित लढतींमध्ये विजय मिळवून त्यांना प्रतिष्ठा राखायची आहे. मागील दोन लढतींमध्ये चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाईट रायडर्सला हरवले. या दोन्ही विजयांत सिंहाचा वाटा उचलला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने या खेळाडूच्या फलंदाजीचे मनभरून कौतुक केले.

महेंद्रसिंग धोनी यावेळी म्हणाला, ऋतुराजला नेटमध्ये फलंदाजी करताना बघितले, पण त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. तसेच 20 दिवस त्याला विलगीकरणातही राहावे लागले. यानंतरच्या तीन लढतींमध्ये त्याला सूर गवसला नाही. तसेच तो शांत स्वभावाचा असल्यामुळे अशा खेळाडूच्या खेळाचे निकष काढणे व्यवस्थापनालाही अवघड जाते. मात्र मागील दोन लढतींमध्ये त्याने आपली चुणूक दाखवलीय. सध्याच्या घडीला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंपैकी तो एक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या