महानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका

252

राज्यासाठी मुबलक वीज निर्मिती करण्याची जबाबदारी असलेल्या महानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. रिक्त होत असलेल्या संचालक पदासाठी अर्ज करण्यासाठी व्यवस्थापणाने 4 ऑगस्टची मुदत दिली होती. तसेच मुलाखती होणार होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे उमेदवारांना मुलाखतीसाठी वेळेत हजार राहणे शक्य नाही, याची दखल घेत महानिर्मितीने अर्ज करण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

महानिर्मिती ही राज्यातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. व्यवस्थापकीय संचालकांनंतर दुसऱया स्थानाचे पद असलेले संचालक (संचलन) हे लवकरच रिक्त होत आहे. त्याची दखल घेत नव्या संचालकांच्या नियुक्तीसाठी महानिर्मितीने अर्ज मागवले होते. मात्र संचलकसारख्या वरिष्ठ पदासाठी देशभरातून तज्ञ उमेदवारांचे अर्ज येणे अपेक्षित होते, परंतू लॉकडाऊनमुळे अनेक उमेदवारांना अर्ज करणे शक्य झाले नाही, त्याची दखल घेत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. दरम्यान रिक्त होत असलेल्या संचलन संचालक या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे ऊर्जा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या