
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील दीडशेहून अधिक औद्योगिक वीज ग्राहकांकडून ‘महावितरण’ने 2014 च्या सुमारास जवळपास तीनशे कोटी रुपयांचे अतिरिक्त वीजबिल वसूल केले होते. सदरची रक्कम महावितरणने नुकतीच संबंधितांना परत केली, मात्र त्यावर व्याज द्यायचे की नाही अशी विचारणा करणारी याचिका महावितरणने वीज आयोगाकडे दाखल केली असून त्यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
वीज आयोगाने 2012 मध्ये दरवाढ जाहीर केल्यानंतर महावितरणच्या 150 ग्राहकांनी कंटीन्युअस गटातून (जादा दराच्या) नॉन कंटीन्युअस गटात (कमी दराच्या) स्थलांतर करण्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यास न जुमानता महावितरणने ग्राहकांना जादा वीज दराच्या गटात ठेवून वीज बिलाची आकारणी केली होती. त्याविरोधात ग्राहकांनी वीज आयोगाकडे दाद मागितल्यानंतर नुकतीच परत केली आहे, मात्र या रकमेवर बँकेच्या दराने व्याज देण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या रकमेवर व्याज द्यायचे की नाही याबाबत निर्देश देण्याबाबत आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.


























































